जम्मू-काश्मीरमधील सीआरपीएफच्या ३१ जवानांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

 

सीआरपीएफच्या 90 बटालियनचे जवान अशा चकमकीत सक्रिय भाग घेतात. परंतु कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर 18व्या बटालियनचे जवान दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त कारवाईत सामील झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे शनिवारी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली होती. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. देशात कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 3,08,993 झाली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 8,884 वर पोहोचला आहे.

Protected Content