जम्मू-काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा

1551586524 jammuandkashmir AP

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) काश्मीर खोऱ्यातील गांदरबलमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आज (मंगळवार) सकाळी सात वाजल्यापासून ही चकमक सुरू झाली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरू केले आहे. काश्मीर खोऱ्यातील गांदरबल खोऱ्यातही आज, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे. यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी या घरात लपून बसल्याची माहिती मिळते.

Protected Content