रवींद्रभैय्या पुन्हा ‘अनलकी’ ! प्रतिष्ठेच्या लढाईत मधुकर राणेंची बाजी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड सोसायटी मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर राणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना पराभव केला आहे.

यंदा दुध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगरची लढत जितकी महत्वाची होती तितकीच बोदवडचीही गणली गेली. कारण येथून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांच्यासमोर भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर राणे यांनी आव्हान उभे केले होते. राणे हे आधी एकनाथ खडसे यांचे समर्थक होते. त्यांनी भाजप मध्येच राहण्याचा निर्णय घेत दुध संघात शेतकरी विकास पॅनलकडून उमेदवारी केली. या लढतीत राणे यांनी बाजी मारली आहे.

आज झालेल्या मतमोजणीत मधुकर राणे यांना २२० तर रवींद्रभैय्या पाटील यांना २१६ मते मिळाली. यामुळे राणे यांनी अवघ्या चार मतांनी विजय संपादन केला.

रवींद्रभैय्या पाटील हे राजकारण आणि सहकारातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाते. ते सध्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत. बोदवड तालुक्यात त्यांचे वर्चस्व मानले जाते. यामुळे दुध संघाच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाचा दावा मानला जात होता. मात्र यात त्यांचा पराभव झाला. यामुळे निवडणुकीच्या बाबतीत ते पुन्हा एकदा अनलकी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Protected Content