केसीईचे आयएमआर कॉलेजात अंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्सचे यशस्वी आयोजन

जळगाव प्रतिनिधी । केसीईच्या आयएमआर कॉलेजात ट्रान्सफॉरमिंग थ्रु रिईंन्व्हेंशन इन द करंट इमर्जींग ग्लोबल ऑर्डर 2020″ या विषयावर अंतरराष्ट्रीय ई-कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले.

आयएमआर आणि AICFTE नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यामानाने कॉन्फरन्स घेण्यात आले. या कॉन्फरन्समध्ये उपस्थित ई-पाहुण्यांचे स्वागत प्रा. डॉ.शुभदा कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर या ई-कॉन्फरन्सची प्रस्तावना करतांना आयएमआरच्या डायरेक्टर प्रा. डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी “कोविड 19 ला संधी मानुन यशस्वी तोंड देणार्‍या आपल्या उद्योजकांविषयी गौरवोद्गार काढले. आणि कठीण काळात उद्योगांची दिशा ठरवून ग्राहकांना दिलासा देणार्‍या या व्यावसायिकांच्या अमूल्य योगदानाची आठवण केली.

पुढच्या काळात मानवी संसाधन हे सर्व प्रक्रियेत तज्ञ आणि औद्योगिक दृष्टीने विकसित असेल ” या काॅन्फरन्स साठी प्रमुख पाहुण्या म्हणुन डॉ.प्रिती बजाज, व्हाईस चान्सलर, गलगोटिया युनिव्हर्सिटी यांनी सहभागी संशोधकांना संबोधित करतांना सांगितले ” न्यू नॉर्मल होतांना भारतिय जुगाड सिस्टीम कशी कार्यरत झाली आणि त्यामुळे जगाची ABCD बदलली असली तरी भारतीय आपल्या उपजत बुध्दीमत्तेने कौशल्याने या परीस्थिती वर मात करुन नव्याने उभे राहात आहेत हा विश्र्वास डॉ प्रिती बजाज यांनी ई उपस्थितीतांना दिला. त्या पुढे म्हणाल्यात आता नोकरी गमावलेल्या लोकांना परत सामावून घेण्यावर भर दिला पाहिजे .

अंतरराष्टीय स्तरावर भारताच्या विविध भागातून तज्ञ संशोधकांचे संशोधन यानिमित्ताने ईथे उपलब्ध झाले. 80 संशोधकांनी आपले संशोधन पेपर या कॉन्फरन्समध्ये सादर केले आहेत. दोन विभागात हे पेपर विभागले गेले होते. त्यात टेक्निकल सेशन आणि जनरल मॅनेजमेंट हे विभाग होते. यासाठी सेशन प्रमुख म्हणुन डॉ.मोहन अग्रवाल, प्रेसिडेंट, इंडोगल्फ मार्केटिंग असोसिएशन दुबई प्रा. पारुल अग्रवाल, डायरेक्टर, सिम्बायोसिस इन्टरनॅशनल, पुणे यांचे विषेश मार्गदर्शन संशोधकांना लाभले. विविध महत्त्वपूर्ण संस्थांमधील अधिकारी, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, आयएमआरचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने या कारेक्रमात सहभागी झाले आहेत.

या आंतरराष्ट्रीय काॅन्फरन्सला विषेश मार्गदर्शन केसीई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांचे लाभले आहे. तसेच संस्थेच्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ. शुभदा कुलकर्णी, प्रा.डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे, प्रा.एस.एन. खान, डॉ.शमा सराफ, प्रा. तनुजा फेगडे, डॉ.अनुपमा चौधरी, डॉ.ममता दहाड, प्रा. उदय चतुर, डॉ. श्वेता चोरडिया, प्रा.अनिल मार्थी, डॉ. निशांत घुगे, प्रा. प्रमोद घोगरे, प्रा. योगेश पाटील, प्रा. अमोल पांडे, प्रा. रुपाली नारखेडे ह्यांनी विविध समिती सदस्य म्हणुन काम पाहिले.

Protected Content