१५ दिवसीय नवचैतन्य अभियानाची सांगता

पाचोरा, प्रतिनिधी | पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून जळगाव पोलीसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “नवचैतन्य अभियान” या १५ दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी १५ दिवसीय अभियानामध्ये लाभलेल्या वक्त्यांचे आभार व्यक्त केले, त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पाचोरा येथील डॉ. भूषण मगर (पाटील) फॉऊंडेशन, पाचोरा यांच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी वक्ते अनिलचंद्र सुर्वे उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी, “स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा, जीवनशैली चांगली ठेवा, शरीराची काळजी घ्या, त्याचबरोबर कुटुंबाची देखील काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा “अशा या आरोग्यासाठी उपयुक्त सूचना उपस्थितांना दिल्या.

Protected Content