कळमोद्यात श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन उत्साहात 

फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कळमोदा येथे ३९ वर्षांपासून परंपरा असलेल्या व  रविवार रोजीपासून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची काल रोजी उत्साहात सांगता करण्यात आली.

येथील आयोजित श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तनात संगितमय श्रीमद भागवत कथा  वाचक ह भ प भावेश महाराज विटनेरकर यांनी वाचन केले.

दैनंदिन कार्यक्रम

सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, ८ ते १२ श्री ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० किर्तन तसेच काल २४ फेब्रुवारी रोजी धनराज महाराज, संत जगन्नाथ महाराज अंजाळेकर  संस्थान अंजाळे. यांचे काल्याचे किर्तन. सकाळी १० ते १२  व अन्नदाता श्री दिनकर पाटील यांच्याकडून महाप्रसाद दुपारी 12 ते 4 पर्यंत, दिंडी सोहळा  संध्याकाळी ६ ते ८  व ह भ प बालाजी महाराज बार्शी जिल्हा सोलापूर यांचा रात्री ८ ते १० पर्यंत भारुडाचा कार्यक्रम होता. मृदंगाचार्य:- ह.भ.प.मुकेश महाराज पाटील, कळमोदा
गायनाचार्य:- ह.भ.प.श्री. अमोल महाराज, भंजाले रावेर, ह.भ.प.एकनाथ महाराज तासखेडा, संगितकार:- ह.भ.प.सुनिल महाराज बामणोद , गायक:- उमाकांत मावळे, उदळी तबला वादक:- डिगंबर महाराज, खिरवड
अनमोल सहकार्य:- फैजपुर, न्हावी, रोझोदा, बोरखेडा, खिरोदा सावखेडा येथील भजनी मंडळी
आयोजक:- समस्त गावकरी मंडळी, कळमोदा

* महाप्रसाद दाते *

ह.भ.प.श्री.दिनकर जगन्नाथ पाटील, कळमोदा
कार्यक्रमासाठी  पंचकोशीतील भजनी मंडळ व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  पांडुरंग पाटील, निवृत्ती जावळे, हेमराज बोन्डे, संजय बोन्डे, डिगबर बाक्षे भास्कर बोन्डे, जगन्नथ बोन्डे, नितीन सपकाळे किरण पाटील शैलेश सराफ  समस्त गावकरी व भजनी मंडळ कळमोदा यांनी केले होते.

Protected Content