सकल मराठा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुकास्तरीय सकल मराठा वधू-वर परिचय मेळावा येथील भुसावळ रोडवरील एका लॉन्स मध्ये उत्साहात पार पडला. यावेळी तीनशेहून अधिक वधुवरांनी आपला परिचय दिला.

सदर मेळाव्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचे वंशज याठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर नगराध्यक्षा साधना महाजन, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, छावा संघटना प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, लीना पवार , श्रीराम पाटील, डी. डी. बच्छाव, संजय गरुड, दिलीप खोडपे, शंकर मराठे, जे.के चव्हाण, राम पवार, गोपाल दर्जी, विजय देसाई, आनंद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. या वधू-वर मेळाव्यात सुमारे ३०० च्या वर वधूवरांनी आपला परिचय दिला. मराठा समाजाला एकत्र आणून समाजासाठी विविध प्रकारच्या विकासात्मक काम करण्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्रित व्हावे असे आवाहन मान्यवराच्या वतीने करण्यात आले.

Protected Content