सलून व्यवसाय पूर्ववत सुरु करा ; भुसावळ नाभिक संघाची मागणी(व्हिडिओ )

 

भुसावळ, प्रतिनिधी । कोरोना या वैश्विक महामारीचा संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्याकरीता राज्य शासनाच्या आदेशानंतर तात्काळ सलुन व्यवसाय बंद करण्यात आला होता या कालावधीत नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांचा व्यवसाय पूर्ववत करण्यात यावा या मागणीसाठी नाभिक संघ, भुसावळ शहरतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व व्यवसाय दि. २३ मार्च रोजी पुर्णपणे बंद करण्यात आले होते. तेव्हापासुन शासन आदेशानुसार बंदच आहे. नाभिक समाजाचा कुटुंब उदरर्निवाह करण्याचे कटींग सलुन हे एकमात्र व्यवसाय असुन ते बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे . तरी नाभिक समाज बांधवांच्या कौटुंबीक अडचणींना समजुन घेत सलुन व्यवसाय पुर्वरत सुरू करण्याची शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी व्यवसाय करण्याचे साहित्य आणि (धोबटी) घेऊन सोशल डिस्टनसिंग चे पालन करत, मास्क लाऊन काळी रिबन डोक्याला बांधून, अंगावर असलेला शर्ट काढून कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता शांतपणे घोषणा लिहलेले फलक हातात घेत आंदोलक उभे होते. हे आंदोलन नाभिक संघ, भुसावळ शहर अध्यक्ष दत्तू शिवलाल खोंडे, सचिव दत्तात्रय सीताराम चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/977833692647410/

Protected Content