मुसळधार पावसामुळे हतनुर धरणाचे 36 दरवाजे उघडले (व्हिडीओ)

hatnur dharan

भुसावळ प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरण क्षेत्रात 51 mm पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडले असून धरणातून 120370 क्युसेस वेगाने तापी नदी पात्रात विसर्ग सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हवामान खात्याने जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दि. 8 व 9 ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरण क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, धरणातून 120370 क्युसेस पाण्याचा तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच अनुचीत घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

Protected Content