आव्हाणे विकासोच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाने येथील विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी उत्तम शामराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी वसंत पौलाद सपकाळे यांची निवड करण्यात आली.

जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला होता. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विजय दत्तात्रय पाटील यांनी केले होते. यात विद्यमान सरपंच भारती भगवान पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडविला होता.  विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात शुक्रवार १३ मे रोजी सकाळी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी उत्तम शामराव पाटील तर व्हाईस चेअरमनपदी वसंत पौलाद सपकाळे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पाटील यांनी काम पाहिले. निवड झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी यांनी स्वागत केले.

याप्रसंगी निवडून आलेले सदस्य अमोल चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मण चौधरी, यादव चौधरी, सुखदेव पाटील, सोपान पाटील, विजय पाटील, जिजाबाई पाटील, मीराबाई पाटील, किरण पाटील, धर्मराज वामन सोनवणे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!