शेताच्या बांधावरून पाण्याची मोटार लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारात असलेल्या शेताच्या बांधावर बसविलेली पाण्याची मोटार लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील गोपाल कालुदास चौधरी (वय-४९) यांचे गावालगतच शेत आहे. त्यांच्या शेतात असलेल्या बांधावर त्यांनी २० हजार रुपये किंमतीची मोटार बसविली होती. ही मोटार अज्ञात चोरट्यांनी लांबवून नेली. ही घटना उघडकीस येताच त्यांनी तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सतीष हाळनोर हे करीत आहे.

 

 

 

 

 

Protected Content