धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये पालक-शिक्षक सभा उत्साहात

cb3d8370 953f 4a4a 88e6 1c889522e6b6

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये पालक – शिक्षक सभा नुकतीच मोठया उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालक -शिक्षक सभेचे विभाग प्रमुख जे.एस. पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकांमधुन धरणगांव शहरातील जेष्ठ नागरिक रघुनाथ चिमन भोई होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष , पालक बंधु – भगिनी व उपस्थित शिक्षक वृंद व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व विद्येची देवता सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

 

याप्रसंगी पालक -शिक्षक सभेचे विभाग प्रमुख पी.डी. पाटील यांनी पालक शिक्षक संघाची उद्दीष्टये सांगुन पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विस्तृत चर्चा करण्यात आली. शाळेतील होणारे विविध कार्यक्रमांची व विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ भोई यांनी मुलांना शिक्षण घ्या – मोठे व्हा – शाळेचे नाव उज्वल करा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पालक -शिक्षक सभेचे विभाग प्रमुख पी.डी. पाटील तर आभार पालक -शिक्षक सभेचे विभाग प्रमुख जे.एस. पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Protected Content