राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक वाघमारे यांची नियुक्ती

WhatsApp Image 2019 10 12 at 6.07.11 PM

जळगाव, प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी धरणगाव पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज त्यांना नियुक्ती पत्र दिले.

धरणगाव येथील दिपक आनंदा वाघमारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी नुकतेच जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हे नियुक्ती पत्र माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, तालुका प्रमुख धनराज माळी, विधान क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, मोहन पाटील, प्रा.एन.डी.पाटील, धरणगाव शहर प्रमुख संभाजी धनगर, नाटेश्वर पवार, माजी नगरसेवक हाजी इब्राहीम, राजू शेख, अरविंद देवरे, अमोल वाजपेयी, डॉ.नितीन पाटील, लक्ष्मण पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content