भोरगाव लेवा पाटीदार पंचायत समाज मंडळाचा आ. सावकारे यांना पाठींबा (व्हिडीओ)

bhorgav leva samaj panchayat

भुसावळ, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.संजय सावकारे यांच्या प्रचारादरम्यान भोर लेवा समाज मंडळाचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी तळवेल येथे जाऊन प्रचाराचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आ.सावकारे यांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

 

गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर समाजाच्या बनावट लेटरपॅडवर एक वृत्त फिरत होते , त्यामुळे समाजाचे मन विचलित होऊ नये, यासाठी कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी तळवेल येथे प्रचारादरम्यान आ.सावकारे यांची भेट घेतली व त्यांना प्रचाराबाबत काही सूचना दिल्या. जि.प.चे माजी सदस्य व ज्येष्ठ भाजपा नेते नारायण पाटील यांच्या निवासस्थानी तब्बल दीडतास कुटुंब नायक पाटील व आ. सावकारे यांच्यात चर्चा झाली. या भेटीमुळे समाजात पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर पडदा पडणार असल्याचे दिसून आले. सोशल मीडियात फिरत असलेल्या पत्रासंदर्भात मात्र आपण अनभिज्ञ असल्याचे ते म्हणाले.

 

 

Protected Content