नागरिकांना पुढील काही दिवस ढिलाई नाही – मुख्यधिकारी रविंद्र लांडे

रावेर प्रतिनिधी । शहरात ‘ब्रेक दि चैन’ चांगला ब्रेक लागला आहे. शहरातील रिकव्हरी रेट ८५ टक्केच्या वर गेला असून आता फक्त १५ पेशंट एक्टिव्ह आहे. लॉकडाऊनला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्यामुळे परीस्थिती चांगली होतेय. ही सुखद बातमी असून नागरीकांनी पुढे काही दिवस अजुन ढिलाई करू नका, असे अवाहन मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.

रावेर शहरात पोलिस प्रशासन व नगर पालिका प्रशासन यांच्या संयुक्त शोध मोहीममुळे रावेर शहराला दिलासादायक बातमी आहे.शहरात ८५ टक्के रिकव्हरी रेट असून सुमारे १५ पेशंट एक्टिव आहे.तरी नागरीकांनी सोशल डिस्टन पाळावा बातमी जरी दिलासादायक असली तरी जनतेने ढिलाई पणा न करण्याचा सल्ला मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी दिला आहे.

ब्रेक दि चैन साखळी तोडण्यासाठी मुख्यधिकारी रस्त्यावर 

रावेर शहरात ब्रेक दि चैन तोडण्यासाठी दिवसभर नगर पालिकेचे कामे आपटुन मुख्यधिकारी रात्री सात ते दहा वाजे पर्यंत रस्त्यावर कर्मचा-यांसह फिरतात विना मास फिरणारे विना कामाने फिरना-यांना थांबवून त्यांची अँटीजन स्टेट केली जाते.ही मोहीम मागील तीन आठवडे पासुन सुरु आहे.यामुळे मुख्याधिकारी रविंद्र लांडे कोरोना रोखण्यासाठी घेत असलेल्या परीश्रमाची शहरातून कौतुक होत आहे.

पोलिस प्रशासनाचे सहकार्य

दरम्यान यासाठी मोलाची साथ ही उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे साह.पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या सहकार्यमुळे व पोलिस कर्मचा-यांचे  मिळत आहे. ब्रेक दि चैन साखळी तोडण्यात यांचे देखिल मोलाचा वाटा आहे.

Protected Content