कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ८४९ रूग्ण बाधित आढळले; ८४७ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली आहे. 

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-८६, जळगाव ग्रामीण- २२, भुसावळ-१६३, अमळनेर-२६, चोपडा-४२, पाचोरा-१५, भडगाव-८, धरणगाव-१५, यावल-२५, एरंडोल-२२, जामनेर-६१, रावेर-५२, पारोळा-१६, चाळीसगाव-४८, मुक्ताईनगर-१७१, बोदवड-५१ आणि बोदवड-२६ असे एकुण ८४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयात आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३२ हजार ४२३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २० हजार १५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ८९४ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content