भुसावळात पुन्हा दोन कोरोना बाधीत

जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी आलेल्या अहवालात भुसावळ येथील दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले असून यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४३ झालेली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी प्रेस नोट जाहीर केली आहे. यानुसार जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या दोन्ही व्यक्ती भुसावळ च्या असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. हे दोन्ही रूग्ण सिंधी कॉलनी व समता नगरमधल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संपर्कातील असल्याची माहिती समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

दरम्यान, भुसावळातील कोरोनाचा प्रकोप वाढीस लागल्याचे आता दिसून येत आहे. शहरात एकूण दहा कोरोनाबाधीत आढळून आले असून यातील दोघांचा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित आठ रूग्णांवर जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content