पहूर येथे कडकडीत बंद; जनता कर्फ्यूला प्रतिसाद ( व्हिडीओ )

पहूर, ता. जामनेर, रवींद्र लाठे । कोरोनाच्या प्रतिकारासाठी येथे तीन दिवसीय स्वयंस्फुर्त बंद पाळण्यात येत असून याला ग्रामस्थांची अतिशय उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने सारा देश हादरला असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. यास आळा घालण्यासाठी व संसर्ग वाढू नये म्हणून पहूर पेठ व पहूर कसबे कोवीड १९ समितीने पासून १ मे ते ३मे असे तीन दिवस पहूर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. त्यानुसार शुक्रवार पासून तीन दिवसीय पहूर कडकडीत बंद व संपूर्ण लॉकडाऊनला जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच पहूर पेठ व पहूर कसबे या गावातील मुख्य रस्ते सील केले.

दिनांक १ मे पासून ३मे पर्यंत जनतेने स्वयंस्फूर्तीने पुकारलेल्या या जनता कर्फ्युला १०० %भरभरून प्रतिसाद मिळत असून पहूर पेठ व पहूर कसबे या दोन्ही गावाच्या प्रवेशद्वारावर मुख्य रस्त्यावर बॅरीकेट, टायर ,लाकूड ,टाकून मुख्य रस्ते सील करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत नागरिकही आपापल्या घरात बसून असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे मध्ये काही अनुचित प्रकार किंवा अफवा पसरू नये म्हणून पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपपोलिस निरीक्षक किरण बर्गे,साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, सानप दादा,ट्रॅफिक हवालदार जीवन परदेशी , पहूर पेठ ग्रामपंचायत कर्मचारी, होमगार्ड इत्यादीनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला.

दरम्यान, १ मे ते ३मे पर्यंत पहूर कडकडीट बंद असल्याने हे तीन दिवस मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते १२ व संध्याकाळी ५ ते ८ तसेच खासगी दवाखाने मात्र सकाळी नऊ ते बारा या वेळेतच सुरू राहणार असून अत्यावश्यक वाटल्यास पहूर ग्रामीण रूग्णालयात येथे रुग्णांनी यावे असे पहूर जनरल प्रॅक्टिस असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. रवींद्र बडगुजर, उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पांढरे, सचिव डॉ. जितेंद्र घोंगडे, व कायदेशीर सल्लागार डॉ. रमेश पाटील यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युज शी बोलताना सांगितले. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना नियमित सेवा पुरविण्यात येत असल्याचे वैधकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी सांगितले आहे. तीन दिवसीय जनता कर्फ्युला पहूर पेठ व पहूर कसबे आधीच संमती देण्यात आली असुन गावात तोंडाला बिना मास्क फिरू नये व विनाकारण फिरू नये. तरी आपणच आपला रक्षक म्हणून कोरोना आपत्तीच्या वेळे योद्धे म्हणून सहकार्य करावे व लॉक डाउन नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

खालील व्हिडीओत पहा : पहूर येथील बंदबाबतचा वृत्तांत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content