पहूर येथे आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा

pahur news 1

पहुर, ता. जामनेर (प्रतिनिधी)। येथील येथील आदिवासी एकता विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 9 ऑगस्ट रोजी आदिवासी एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवनगर येथून आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रा आदिवासी बांधवांनी काढली, ही शोभायात्र बस स्टँड पहूर पेठ, पहूर कसबे गावातून मिरवणूक काढून आदिवासी बांधवांनी आपला पारंपारिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करीत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

याप्रसंगी आदिवासी एकता विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज तडवी, सचिव राजू तडवी, सहसचिव कमृद्दिन तडवी, सामाजिक कार्यकर्ते तौफिक तडवी, जाफर तडवी अहमद तडवी, गयास तडवी, अफजल तडवी, राजू तडवी, आयुब तडवी, अब्बु तडवी, चांद तडवी यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ. सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, अनिल देवरे, प्रवीण देशमुख पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख ठेवला.

Protected Content