चोवीस तासांत देशात तब्बल ३ हजार ९०० नवे कोरोनाबाधित रुग्ण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
मागील चोवीस तासांत देशात तब्बल 3 हजार 900 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 195 जणांचा बळी गेला आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 46 हजार 433 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1568 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये आतापर्यत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

Protected Content