धरणगावातील संशयिताचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह; काळजी घेण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोना संशयिताचा अहवाल निगेटीव्ह आला असला तरी शहरवासियांनी काळजी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

शुक्रवारी सायंकाळी धरणगाव येथील कोरोना संशयित असणार्‍या रूग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने शहरवासीय तसेच प्रशासकीय यंत्रणांचा जीव भांड्यात पडला आहे. अर्थात, या विषाणूचे सावट अद्याप पुर्णपणे दूर झालेले नाही. नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनीही शहरवासीयांना नेमका हाच इशारा दिला आहे. ते म्हणाले की, या रिपोर्टमुळे धरणगावकरांना दिलासा मिळाला असला तरी ही लढाई अद्याप संपलेली नाही. आजवर आपण एकजुटीने याचा जसा प्रतिकार केला अगदी त्याच पध्दतीत पुढे देखील करूया असे नमूद करत त्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content