एनपीआर व एनआरसीच्या विरोधात देशव्यापी अभियान- योगेंद्र यादव

yogendra yadav

भुसावळ संतोष शेलोडे । एनपीआर, एनआरसी आणि सीएए आदी कायद्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार देशात फुटीचे वातावरण निर्माण करत असून याला विरोध करण्यासाठी देशव्यापी अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती आज योगेंद्र यादव यांनी दिली. हे आंदोलन २२ फेब्रुवारी ते २३ मार्चच्या दरम्यान होणार असून यात देशवासियांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

भुसावळ येथे संविधान बचाव कृती समितीतर्फे एनपीआर, एनआरसी आणि सीएए विरोधात योगेंद्र यादव, उमर खलिद यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सदर सभेत फक्त योगेंद्र यादव यांना बोलण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याने सदर सभेत योगेंद्र यादव यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे नेते गफ्फार मलिक उपस्थित होते. यावेळी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यावर योगेंद्र यादव यांनी टीकास्त्र सोडले.

योगेंद्र यावद यांनी सभेत सांगितले की, संविधान विरोधी कायदाला विरोध करण्यासाठी 22 फेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान आंदोलनाची तयारी करण्यात येणार असून एप्रिलमध्ये हा कायदा लागू होणार आहे. म्हणून ४ एप्रिलला या कायद्याच्या विरोधात दिल्लीत होणारा विरोध प्रदर्शनात देशभरातील आंदोलनकारी यांनी सहभागी व्हावे. हा कायदा कुणा एकावर नसून देशाच्या सर्व गरीब आदिवासी दलित नागरिकांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे या कायद्याचा विरोध करा. तसेच उत्तर प्रदेश सरकार आंदोलकांवर अन्याय करत आहे. ते आपण समजू शकतो. पण महाराष्ट्र सरकार या आंदोलनात प्रति दुजाभाव का करत आहे. असा सवाल यावेळी योगेंद्र यादव यांनी केला आहे.

पहा यादव नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/207628980362990/

Protected Content