भुसावळ येथे सेंट्रल रेल्वे स्कूलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

473de1ca b581 4303 9182 66cfb5503022

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील रेल्वे स्कूल येथे आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे व शैक्षणिक समुपदेशक सुमित्रा गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

त्यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी अभ्यास करावा, पण परीक्षेची भीती बाळगू नये. ठराविक व्यवसायिक क्षेत्राचा विचार न करता विविध संधी आज उपलब्ध आहेत, त्याचा विचार करून जीवनात यशस्वी व्हावे. असा मोलाचा सल्ला दिला. सुमित्रा गांगुर्डे यांनी पेपर कसा सोडवावा, वेळेचे कसे नियोजन करावे आणि परीक्षेच्या दिवसांत तब्बेतीची कशी निगा राखावी याबद्दल उपयुक्त माहिती दिली. याशिवाय प्राचार्य सतीश कुलकर्णी, दहावी बारावीचे वर्ग शिक्षक स्वाती चतुर्वेदी, सुकांत मिश्रा, कीर्ती काळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी दहावी आणि बारावीच्या काही विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यात तनिष्का साळवे, अरिहंत तिरपुडे, साक्षी पाटील, चंचल मिसाळ यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने उतुंग भरारी घ्यावी, या संकल्पनेतून ज्ञानदीप गॅसच्या फुग्याद्वारे उंच आकाशात सोडण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते पारिोषिक वितरणाचा कार्यक्रम आणि रसायन शास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनासाठी विद्यालयाच्या शिक्षिका मंगला भालेराव आणि आरती रामटेके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल संतोष उपाध्याय यांनी केले. कार्यक्रम यशसवीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content