भुसावळ येथे इनरव्हील क्लबच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

inervheel club

भुसावळ, प्रतिनिधी | येथील प्रभाकर हॉलमध्ये इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटीची बैठक आज (दि.५) जिल्हा चेअरमन वैजयंती पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीनंतर भालचंद्र धोंडू पाटील विद्यालयात उमेश घुले यांच्यातर्फे देण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचा शुभारंभ वैजयंती पाठक यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अध्यक्षा डॉ.मृणाल पाटील, सचिव मोना भंगाळे, आयआयपी सुनिता पाचपांडे, खजिनदार रेवती मांडे, आयएसओ प्रतीक्षा पाटील, सीसी पल्लवी वारके, प्रकल्प चेअरमन हेमलता सोनार आदी उपस्थित होते. नुतन सदस्‍या वंदना नेमाडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता संध्‍या कोलते, नगरसेविका मीनाक्षी धांडे, अदिती भडंग, भारती वानखेडे, किरण जावळे, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मॅडम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content