Home Cities भुसावळ वरणगावात शिवसेनेला बळ; राजेश बोदडे, ललिता बोदडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

वरणगावात शिवसेनेला बळ; राजेश बोदडे, ललिता बोदडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

0
18


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव, ता. भुसावळ येथे शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाले असून शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश बोदडे, त्यांच्या धर्मपत्नी ललिता बोदडे यांच्यासह आरती माळी, कविता जाधव आणि रेखा गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. वरणगाव शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजेश बोदडे आणि ललिता बोदडे यांच्यासह आरती माळी, कविता जाधव आणि रेखा गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक विलास मुळे, विधानसभा प्रमुख संतोष माळी, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, शहरप्रमुख दुर्गेश बेदरकर, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख सविता माळी, मनीषा पाटील, रेखा देशमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नवीन सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे वरणगाव शहरातील शिवसेनेच्या संघटनेला आगामी काळात अधिक सक्रियता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.


Protected Content

Play sound