रघुनाथ सपकाळे यांची साकेगावातून अपक्ष उमेदवारी

 

 

जळगाव : प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीच्या यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवारीचा निर्णय रघुनाथ सपकाळे यांनी जाहीर केला आहे .

प्रभाग क्रमांक ४ मधून ते निवडणूक लढविणार आहेत . व्यवसायासोबतच त्यांनी सामाजिक कामांमधून मोठा जनसंपर्क वाढवलेला आहे . गरजू लोकांना प्रसंगी पदरमोड करून मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे कित्येक गरजू लोकांची कामे केलेली आहेत . प्रामुख्याने निराधार लोकांना सरकारी योजनांचा फायदा मिळावा म्हणून केलेल्या कामांमुळे आता गावाच्या राजकारणाला विधायक दिशा देण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले .

या विधायक कामांच्या रचनेत युवकांचा सहभाग वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले अगदी कोरी पाटी म्हणून राजकारणात यश मिळेल असा आत्मविश्वास आहे , जाणीवपूर्वक आपण राजकीय पक्षांचा शिक्का आपल्यावर मारून न घेता किंवा प्रस्थापित राजकारणी लोकांचा समर्थक अशी ओळख जनमानसात होऊ न देता घेतलेला हा अपक्ष उमेदवारीचा निर्णय एक प्रकारचे धाडस आहे आणि हे धाडस मी युवा साथीदारांच्या बळावर करणार आहे असेही त्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले

पाणीपुरवठा , निराधारांना आधार आणि गरजू मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न हे काम मला महत्वाचे वाटते असेही ते म्हणाले .

 

Protected Content