Home Cities जळगाव रेखा वर्मा यांची भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती 

रेखा वर्मा यांची भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती 

0
119

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।b भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी रेखा लक्ष्मीनारायण वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेखा वर्मा या भाजपच्या सक्रिय महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक मानल्या जातात. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीप्रसंगी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, नंदकिशोर (नंदू) महाजन तसेच भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या शुभेच्छा लाभल्याचे सांगण्यात आले. रेखा वर्मा यांच्या नियुक्तीचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी विशेष अभिनंदन केले. त्यांनी वर्मा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, महिला सक्षमीकरण आणि पक्ष संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांच्या कार्याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्याचे राज्याच्या राजकीय पटलावरील प्रतिनिधित्व अधिक मजबूत होणार असून, महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्ष विस्तार आणि महिला नेतृत्वाला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound