Home Cities जळगाव जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर 

जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर 

0
9

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील काँग्रेस संघटनेला बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मंजुरीनंतर जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस, सचिव, कार्यकारिणी सदस्य आणि विशेष निमंत्रित अशा विविध पदांवर अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत डॉ. राजेंद्र पाटील, विलास तायडे, हरिष गनवाणी, रविंद्र निकम, अमरिश गरूड, भारत पाटील आणि मासूम तडवी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोहन काशिनाथ पाटील यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नंदकिशोर सांगोरे, मुलचंद नाईक, अॅड. योगेश गजरे, शैलेश बडदे आणि कलीम खान मण्यार यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिवपदी दिनेश पाटील, संजय सोनावणे, दिलीपसिंह पाटील, शेख अरिफ शेख शरीफ, रफिक शेख, गणेश पांढरे, शेखर पाटील, किरण पाटील, अॅड. अरविंद गोसावी आणि सागर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून हयात खान, उस्मान तडवी, राशिद जनाब, इलियास मेनन, सुधाकर बडगुजर, शरिफ शेख, जगदेव बोरसे आणि देवानंद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश विठ्ठल चौधरी, डॉ. सुरेश शामराव पाटील, एस. ए. भोई, उदय पाटील, डॉ. राजेश मानवतकर आणि स्मिता संदीप पाटील यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीमार्फत ग्रामीण भागात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष विस्तार, बूथस्तरावरील संघटनात्मक कामे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्याची जबाबदारी असणार आहे.


Protected Content

Play sound