शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभार आणि चुकीच्या निर्णयामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या दालनात आज मंगळवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास बेमुदत उपोषण आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनाच्या वतीने  विविध मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थेत गेल्या अनेक महिन्यांपासून वाद आहे. याबाबत शासनाने नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे संदीप शंकराव बोरसे हे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. दरम्यान मराठा विद्या प्रसारक मंडळात दोन गट असल्यामुळे संस्था चालकांमध्ये वाद असल्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांच्याकडे कारभार सोपवला आहे. संस्थेचा वाद न्याय प्रविष्ठ असल्याने संस्थेच्या शाळांमधील कोणत्याही शिक्षकाची बदली होणार नाही असे स्पष्ट आदेश आहेत. असे असंताना देखील राजकीय दबावापोटी उपशिक्षक संदीप बोरसे यांची बदली एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील साधना माध्यमिक विद्यालय करण्यात आाली.  बोरसे यांची बदली करण्यासंदर्भात कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही तसेच बदल्याची कोणत्याही अर्ज मुख्याध्यापकांमार्फत केलेला नाही, संस्थेचे कारभार हा न्यायप्रविष्ट असल्याकारणामुळे मूळ आस्थापनेवर हजर राहण्याच्या सूचना आहेत. परंतू राजकीय दबावापोटी शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी शिक्षकांची बदली करून बदलीच्या ठिकाणीच वेतन काढण्यात आले. संस्थाचालक, शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील आणि शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनाच्या माध्यमातून तालुकाप्रमुख असलेले संदीप बोरसे यांच्यासह शिक्षकांनी आज मंगळवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या दालनात ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

या उपोषणाला उपशिक्षक संदीप बोरसे, कनिष्ठ लिपिक संतोष गोसावी, कृष्णराव विसावे, जामनेर येथील उपशिक्षक देवराम ठाकरे, रूपाली बोरसे, शीतल गोस्वामी, गर्गी बोरसे, यज्ञा बोरसे यांच्यासह आदी शिक्षकांनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/395033608722468

 

Protected Content