ओझरखेडा तलावात आ . चंद्रकांत पाटलांचे जलसमाधी आंदोलन (व्हिडीओ)

मागण्या मान्य झाल्याशिवाय बाहेर न येण्याचा इशारा ; प्रशासन हादरले

वरणगाव : दत्तात्रय गुरव ।  दोन तासापासून मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील जलसमाधी आंदोलनासाठी भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा तलावांमध्ये उतरले आहेत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे

ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशा मागणीचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते . मागण्या मान्य  न झाल्यास शेतकऱ्यांसह  आजपासून जलसमाधी आंदोलन करणार, अशा इशारा आ. चंद्रकांत पाटील यांनी निवेदनावेळी दिला  होता

सद्या पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल  आहे. दीड महिन्यांपूर्वी वरणगाव – तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ .अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी  उपलब्ध करून दिला होता. परंतु जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी आजतागायत तातडी न दाखविल्याने दरम्यानच्या काळात मुबलक पूरस्थिती हतनूर धरणाला सुरू होती. अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुलफिल झाले असते. परंतु निव्वळ हलगर्जीपणा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. यामुळे सदरील धरण कोरडेठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळीसह इतर पिके संकटात सापडली आहे.

 

आमदार चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना 11 ऑगस्टरोजी मुंबई येथे व जिल्हाधिकारी डॉ राऊत यांना 10 ऑगस्टरोजी ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे व संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी, अशा मागणी साठी निवेदन दिले होते. परंतु आद्यपपावेतो कुठलीही कारवाई न झाल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व हजारो शेतकरी थेट ओझरखेडा धरण येथे जलसमाधी आंदोलन करणार आहे असा इशाराही देण्यात आला होता .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!