मोदींचा पाकवर थेट ठपका

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । जम्मू आणि काश्मीरमधील नगरोटा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या ४ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेतले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काही ट्विट केली आहेत. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी ज्या इराद्याने भारतात आले होते, ते पाहता आमच्या सतर्क सुरक्षादलांनी त्यांच्या इराद्यावर पाणी फेरले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. (

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित ४ दहशतवाद्यांकडून मोठ्या संख्यने शस्त्रास्रे आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली. हे पाहता हे दहशतवादी आमच्या देशात दहशतवाद पसरण्यासाठी आहे होते हे स्पष्ट होत आहे

मोदी पुढे म्हणाले की, आमच्या सुरक्षादलांनी पुन्हा एकदा शौर्य आणि त्यांच्या सतर्कतेमुळे दहशवाद्यांचा कट उधळून लावला आहे. सुरक्षादलांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकशाही प्रणालीला लक्ष्य करणारा एक अपवित्र कटाचा पराभव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली. हे ४ दहशतवादी २६/११ च्या हल्ल्याच्या दिवशी २६ नोव्हेंबरलाच पुन्हा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात तयारीत होते. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना चकमकीत ठार करत त्यांच्या योजनेला सुरुंग लावला.

Protected Content