स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन : स्मशानात मांडला ठिय्या

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी हिताकडे दुर्लक्ष झाल्याचा निषेध म्हणून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने अनोखे आंदोलन केले.

 

या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या १० ते १२ दिवसापासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यावर शेतकर्‍यांसाठी किंवा शेतकरी हिताचे कुठलेही निर्णय न घेतल्यामुळे तसंच दररोज कुठल्या ना कुठल्या विभागात संप सुरू असल्यामुळे शेतकर्‍यांचे काम ठप्प पडलेले आहेत.  त्यामुळे शेतकर्‍यांचा जगून काहीही फायदा नाही, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात अनेक शेतकर्‍यांनी आज संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील स्मशानभूमीमध्ये गळफास घ्या , असे आंदोलन पुकारलेल आहे.

 

येत्या १२ तासात सरकारने शेतकर्‍यांसाठी काही केलं नाही,  तर आम्ही स्मशानभूमीतच गळफास घेत जीवन संपवत असल्याची भूमिका यावेळी,  प्रशांत डीक्कर यांनी सांगितले .. यामुळे मात्र जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत शेतकर्‍यांनी स्मशानभूमीतच ठिय्या मांडलेला होता.

Protected Content