Home धर्म-समाज मयत पोलीस कर्मचार्‍यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

मयत पोलीस कर्मचार्‍यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.


नांदुरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गंगापूर येथील रहिवासी पोलीस नाईक संतोष समाधान वानखेडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

तालुक्यातील ज्ञान गंगापूर येथील रहिवासी पोलीस कर्मचारी नाईक पोलीस कॉन्स्टेबल संतोष समाधान वानखडे यांचे काल हृदयविकाराने त्याचे वयाच्या ४० व्या वर्षीदुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर  शासकीय इतमामान अंत्यविधी ज्ञानगंगापूर येथील समशान भूमीत करण्यात आले.

 

याप्रसंगी संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस कर्मचार्‍यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व   नागरिक व महिलांनी साश्रू नयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला.  यावेळी पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेत फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधिक्षक थोरात, डी वायएसपी अमोल कोळी ,ठाणेदार सतीश आडे पिंपळगाव राजा, बेहेराणी ठाणेदार नांदुरा यासह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 

संतोष वानखेडे यांची बदली खामगाव उपविभागीय कार्यालयामधून नुकतीच नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये १५ दिवसा अगोदर बदली झाली होती. संतोष वानखडे हे २००६ मध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणातून पोलीस खात्यामध्ये रुजू झाले होते. संतोष वानखेडे हे पाच बहिणीमध्ये एकच भाऊ होते त्यांना पत्नीसह एक मुलगा व एक मुलगी लहानअसून त्यांच्या गेल्याने कुटुंबासह गाव व परिसरात शोकाकळा पसरली आहे.


Protected Content

Play sound