रावेर वनविभागाकडून वनरक्षकाच्या कुटुंबाला 36 हजाराची मदत

van rakshak

रावेर प्रतिनिधी । सहस्त्रलिंग येथे अपघातात वनरक्षक ममता पाटील व त्यांचे पती ठार झालेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले होते. सामाजिक बांधीलकीमधुन येथील वनक्षेत्र हद्दीतील सर्व अधिकारी कर्मचा-यांकडून 36 हजार 200 रुपयांची व्यक्तीगत मदत करण्यात आली असून मयत वनरक्षकांच्या कुटुंबाकडे सुपुर्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या दाम्पत्याची चार वर्षाची चिमुकली पोरकी झाली आहे. सामाजिक बांधीलकीमधुन मदत करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबाकडे देण्यात आली आहे. यामध्ये वनक्षेत्रपाल मुकेश महाजन, वनपाल अतुल तायडे, ए.एस. कोळी, एस.बी.भदाणे, आर.पी.तायडे, व्ही.एस.नारखेडे, वनरक्षक रोहिणी सोनार, अरुणा ठेपले, हरीश थोरात, कल्पना पाटील, तर के-हाळा येथील ग्रामस्थ अमोल पाटील दीपक पाटील यांच्यासह अनेक वनरक्षक वनमजूर आदींनी सरळहाताने पाटील कुटुंबांना मदत केली आहे.

Protected Content