छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्षपदी उमेश पाटील

जळगाव, प्रतिनिधी । येथील वाल्मिक नगर भागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांची छावा मराठा युवा महासंघाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

माजी महानगर अध्यक्ष प्रशांत फाळके यांचा १ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने , जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी उमेश पाटील यांची महानगराध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती केली. नियुक्ती पत्र देतांना जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , मावळते महानगराध्यक्ष प्रशांत फाळके व छावा महासंघाचे सदस्य उपस्थित होते. या नियुक्ती बद्दल महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटिल , लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे , बहुजन नेते मुकुंदभाऊ सपकाळे , सामाजिक कार्यकर्ते मनोजभाऊ सोनवणे व निलेश आबा तायडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content