सर्पदंश झालेल्या १५ वर्षीय बालक योग्य उपचाराने बचावला

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेड येथील १५ वर्षीय मुलाला संर्पदंश झाला होता. त्याला उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टारांनी तत्काळ योग्य उपचार केलाने मुलाची प्रकृती बरी झाली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेड येथील १५ वर्षीय प्रमोद ज्ञानेश्वर मुंडे यांला १६ जूलै रोजी सायंकाळी साप चावला असता त्यांनी प्रथम मुक्ताईनगर व नंतर जळगाव येथे रात्री ६ वा डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात बेशुध्द व अत्यावस्थ अवस्थेत दाखल झाले. सहायक डॉक्टर एकांश खरे यांनी तपासणी करून फिजीशियन डॉ. चंद्रया कांते यांना रूग्ण अत्यावस्थ असून हालचाल होत नाही तसेच साप चावल्याचे कुठेही चिन्ह दिसत नसल्याची माहिती दिली. त्यांनी व्हीडीओ कॉलव्दारे रूग्णांची तपासणी करून सहायक डॉ.एकांश खरे, डॉ मोनिका येरमवार, डॉ. सिमरन थांनवी, डॉ शायमा शेख यांचेशी चर्चा करून आवश्यक ती औषधी व इजेंक्शनचा डोस दयायला लावला. तसेच दुसऱ्या दिवशी देखिल परिस्थीती बाबत चर्चा करून औषधोपचार सूरू ठेवले. हळूहळू रूग्णांची परिस्थीती आता धोक्याबाहेर असून पुर्णपणे बरा झाला आहे. एक दोन दिवसात त्याला घरी रवाना करण्यात येणार आहे.

Protected Content