मोहराळा येथे मध्यरात्री तरूणाची दुचाकी जाळली

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी । तालुक्यातील मोहराळा येथे मध्यरात्री एकाने ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी जाळून टाकण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सुरेश ज्ञानेश्वर गिरी (वय-३२) रा. मोहराळा ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ डीटी ७५४३) क्रमांकाची बजाज प्लॅटीना कंपनीची दुचाकी आहे. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान गावातील राहणारा संशयित पंकज साहेबराव पाटील याने ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटवून दिली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली आहे. यासंदर्भात सुरेश ज्ञानेश्वर खैरे यांनी यावल पोलिसात धाव घेऊन संशयित आरोपी पंकज पाटील यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राजेंद्र पवार करीत आहे.

Protected Content