सात्वीक आहार शाकाहार : शिवानी दिदी

जळगाव प्रतिनिधी । अन्न घरातील सात्वीक असावी. जर आम्हांस खुशी हवी तर सात्विक अन्न मिळावे. संकल्प करा तुमचे शहरच सात्विक बनावे. शाकाहार श्रेष्ठ आहार असल्याचे शिवानी दीदी यांनी सांगितले

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शिवानी दिदींनी खुशीचा पासवर्ड यावर व्याख्यान दिले.  सुरुवातीस स्वागत ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजींनी केल. त्यांनी केलेल्या ओमशांती ध्वनीने आसमंत उजळला. जळगावकरांची मनाची आवाज शिवानीदीदींनी ओळखली आणि आपल्या सर्वांना खुशीचा पासवर्ड देणार आहेत.

त्या निष्पाप पशु कडे पहा जो स्वच्छंदी आहे आणि ज्यास माहित नाही आपले काय होईल. आणी त्याकडे अन्न म्हणून पाहतात. परंतु ते प्रोटीन असू शकते मात्र दुख: दर्द देणारे प्रोटीन काय कामाचे. सात्विक अन्नामुळे हलके असावे.

  स्वयंपाक असा बनवा जसे सर्व घरासाठी प्रसाद बनवित असाल. बाहेरचा खाणे व्यावसायिकसाठी आहे. त्यात नफा, तोटा असेल. बनविणा­यांचा मनस्थितीचा विचार त्यात असतो. त्यामुळे अन्नाचा मनावर फरक पडतो. आपण म्हणतो कुणाचा घराचा पाणी प्याले, कुणाचे मिठ खाल्ले हा वाक्यप्रचारच बरेच काही शिकवितो. 

स्वयंपाक बनवितांना मंत्र, भजन बनवितांना हवे. त्यामुळे मंदिराची अनुभूती होतील. जेवण करतांना आमच्या घरातील टिव्ही नाही चालणार, फोन नाही पहाणार, जेवण करतांना परमात्म्याची आठवण करावी आणि त्याच्याच आठवणीत ते भोजन करावे. धन आशीर्वादाबरोबर, अन्न सात्विक असेल, मनासाठी सकाळ आणि संध्याकाळ सात्विक असावे.  सेवाकेंद्रावर ध्यानाभ्यासाठी येणाचे त्यांनी आवाहन केले. 

खुशीचा पासवर्ड :

शांती सागर की लहरे या मेटिटेशन गीताने आपल्या मधुर वाणीने सुरुवात केली. आपल्या व्याख्यानात त्या म्हणाल्या की, आजपर्यंत फोन, लॅपटॉपचा पासवर्ड ठेवत होते आता खुशीचा पासवर्ड शोधतात. आपल्या पैकी किती जण खुश राहू इच्छितात? यांची संख्या फार मोठी आहे. मात्र यासाठी खुशी पाहिजे ही बाब नव्हे तर खुशी आपल्याकडे आहेच. 

साधने आणि आरामाची व्याख्या :
प्रत्येक वस्तु आम्हांस आराम देते खुशी घेणे आमच्या हातात आहे. गाडी आम्ही घेतली. साधने भोैतिक आराम देते, साधन विकत घेऊ शकतात पण मनाचा सुकून खरेदी करु शकत नाही. त्यांनी उपस्थितांकडून वदवून घेतले – हम साधन खरदी सकते, हम आराम खरीद सकते, सुकून नही खरीद सकते. खुश राहण्यासाठी पैशांची आवश्यकता नाही. खुशी मनाचा सुकून आहे, खुशी आमच्या विचारांच्या आत दडलेली, आहे, प्रत्येक कर्मात दडलेली आहे, कर्म आणि व्यवहारात दडलेली आहे. खुशी म्हणजे, जेव्हा आमचे मन स्थिर राहीलेले आहे.

विचारांचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात :
आमचा विचार करणे कुणाच्या हातात आहे, आमच्या हातात किंवा व्यक्ति किंवा परिस्थितीच्यां अधिन आहे? लोकांच्या व्यवहाराने कुणाची परिस्थिती हलते ? खुश राहण्यासाठी लोकांचा व्यवहार. परेशान होणे, अशांत होणे डिस्टर्ब होणे काय यह शक्य आहे? काय हे शक्य आहे की व्यक्ति वर आपली स्थिती अवलंबून आहे.  परिस्थिती शब्दातच त्याचा अर्थ आहे, परिस्थिती म्हणजे दुस­यांची स्थिती, जस-जसे आम्ही मनाची परिस्थिती दुस­यांवर आधारित ठेवली. अर्थात आमचा विचारांचा रिमोट दुस­यांकडे दिला. 

आजकाल कुणी सोशल मीडियावर लाईक केले नाही तर मन डिस्टर्ब होते. आम्ही गुलामीच्या जीवनावर जगतो. कुणी जर आमची निंदा केली आमचा मूड ऑफ. आमचा मनाचा रिमोट कंट्रोल दुस­याचा कडे दिला. एकदा चेक करा खरच माझा विचारांचा रिमोट दुस­यांकडे दिला आहे काय? मन माझे आहे, मालिक मी आहे. फारच छोट्या छोट्या गोष्टींमधे आम्ही डिस्टर्ब होतो.

आज आम्ही एक गोष्ट नक्की करा की आम्ही लोकांना परिवर्तन करण्याचे विचार क डिग्री नका. काही व्यक्ति बदल करणे ठरवितात पण परिवर्तन करण्याची सवय त्यांच्यात नसते. जो परिवर्तन विचार करु शकत नाही. समस्या त्यांच्या सवयीची नाही परंतु आमच्या अपेक्षांची आहे. जीवन जगण्याच्या दोन पध्दती आहेत, एक स्विकार करणे, दुसरे अपेक्षा ठेवण्यात प्रत्येकाचा संस्कार आपला आहे. 

प्रत्येक आत्म्यावर पाच प्रकाराचे संस्कार आहे. 

1. पूर्व जन्माचे संस्कार. प्रत्येक आत्मा आपल्या पूर्व जन्माने आपल्या बरोबर संस्कार घेऊन येते. एकाच मातापित्यांची दोन मुले पण दोघंात भिन्नता असते. 

काही मुलांमध्ये वेगवेगळया सवयी असतात. काही मुले बडबडी तर काही शांत. काही निटनेटकी ठेवणारी काही अस्ताव्यस्त ठेवणारी. आहेत एकाच घरातील पण संस्कार वेगवेगळी.

2. प्रत्येक मुलास त्यांच्या माता-पित्याकडून , परिवाराकडून संस्कार मिळतात

3. वातावरणाचा प्रभाव संगाचा रंग. मित्र मंडळीकडून मिळालेला संस्कार

4. आपली इच्छा शक्ति. 

5. आत्म्याचे मूळ संस्कार. हे मात्र प्रत्येकाचे सारखेच आहे. अगोदरचे चार प्रकार जन्मानंतरचे आहेत. मात्र हे संस्कार मुख्य आहे यात सात संस्कार आहे.

1. पवित्रता. त्यात काहीच विकार नसतात. 2. शांती – प्रत्येकास शांती आवश्यक आहे. 3. प्रेम- प्रत्येक जण म्हणतो मला प्रेम हवे. पण ते त्याचा मुळ संस्कार आहे. 4. शक्ति 5. सुख. 6. ज्ञान. 7. आनंद. हे सात गुणांची त्यांनी उपस्थितांकडून अनुभूती करवून घेतली. 

अवलंबून राहणे कुठल्याही गोष्टीवर समस्या बनते. परमात्मा म्हणतात कोणत्याही सवयीस माझी सवय म्हणू नका तो डाग पक्का होईल. माझा – माझा म्हणून नका. सवयी बाबत असे म्हणू नका मात्र वरील सात गुणांबाबत मात्र निश्चित म्हणा.

संकल्प सिद्ध होतात तेव्हा नेहमी नेहमी चांगले संकल्प करा. नकारात्मक संकल्प करुन करुन ते पक्के होतील. कोणत्याही समस्यांचा पाढा वाचू नका तो पक्का होईल. प्रत्येका कडून मदत मागतात, अनेकांकडून मागतात परंतू मिळत नाही मग शेवटी परमात्म्याकडे मागतात आता तूच आहे मदत कर. अर्थात परमात्म्यास शेवटी स्थान ठेवतात. जर प्रथम स्थानीच परमात्म्याकडून मदत मागीतली तर निश्चित आपणास ती मिळेल कारण तो आपला पिता आहे. 

अनुभूती – डोळे बंद करा. तुमच्यातील तीन वाईट सवयी डोळयासमारे ठेवा. ज्यामुळे तुम्हास ती बाधा आणते. जशी चिंतेची सवय असेल. तर संकल्प करा मी निश्चित आत्मा आहे, परमात्मा माझ्या बरोबर आहे, माझ्याशी जे होईल ते चांगले होईल. आपणास वाटते की संकल्पाने हे बदलेल. निश्चितच हे सत्य आहे. संकल्पात मोठी शक्ति आहे. 

खर तर विचार करण्याची पदध्तीनेच संस्कार होतात. जसे तुम्ही म्हणता मी आज फार थकलो आहे, या वाक्यानेच खरे तर मरगळ जास्त वाढते. कुटुंबातही याकडे लक्ष वेधले जाते की आज हे थकलेले आहे. मात्र जर संकल्प दृढ राहीले तर निश्चित सकारात्मक बदल जाणवतात. जर म्हटले मी बिल्कूल ताजातवाना आहे असे म्हटले तर एकदम बदल जाणवतो. भाषा,एनर्जी, संकल्प, बोल फार विचार करुन करावा. त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या शक्तिंचे निर्माण होते.

जर कुणाला उशीरा येण्याची सवय असेल तर आजू बाजूचे तर म्हणताच की हे उशीराच येतात. त्यामुळे तुमची एक ओळख बनून जाते. मात्र याकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिले तर मात्र ही बाब तुमच्या कडून परिवर्तन होऊ शकते. 

सकाळी आम्ही काय करतो :
सकाळचा पहिला तास आम्ही काय वाचतो, पहातो, त्याकडे लक्ष द्यावे.सकाळचा पहिला तास तेच फिड करा जे मी बनने चाहतो. सकाळी सकाळी घुस्सा, नफरत, चिंता जे माझे नाही. सकाळचा पहिला तास आत्मा रुपी बॅटरीस चार्ज करावा. 

रात्री अर्धातास झोपण्या अगोदर. आज सगळयांची समस्या झोप लवकर येत नाही. याचे कारण रात्री झोपतांना भरलेल्या गोष्टी, बरेच लोक रात्री झोपण्याअगोदर टीव्हीवरील मालिका, चित्रपटांमध्ये गुंतवितात, फोन मध्ये गुंग राहतात. मात्र एकच लक्षात ठेवा झोपण्याचा अगोदर अर्धातास चांगल्या बाबींचे चिंतन करा पहा तुमची सवय बदलले. गुन्हयांच्या धारावाहिका, फिल्म कादंबरी आदि मुळे नकारात्मक बाबी वाढतात. 

राजयोग शिबीराचे आयोजन :
याप्रसंगी त्यांनी राजयोग शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. हे शिबीर सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिर आणि संख्याकाळी 7 वाजता ब्रह्माकुमारी विद्यालयात दि. 9 ते 11 मार्च रोजी आयोजित केले आहे. 

कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे प्र.कुलगुरु प्रा. पी.पी. माहुलीकर, आमदार सुरेश भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, एजीएम वसंत भोकरे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, जिल्हा तहसिलदार दीपमाला चौरे, बी.के. आनंद भाई, बी.के. राजू भाई तत्पूर्वी बी.के. आश्विनी आणि बी.के. विकास यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचलन केले. शंकध्वनी आय.एच.पाटील यांनी केले. कु. राधीका यांनी स्वागत नृत्य केले. कार्यक्रमाचे संचलन ब्रह्माकुमारी हेमलता यांनी केले. 


Protected Content