कैद्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या एकास अटक

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा कारागृहातून कैद्यांना पळविण्यात मदत करणाऱ्या अजून एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (वय-२४) रा. तांबापुरा, अमळनेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, २७ जुलै २०२० रोजी जिल्हा सबजेलमधून कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे याला डोक्यावर गावठी पिस्तूल लावून कैदी असलेले आरोपी सागर संजय पाटील (वय-२३) रा.शिवाजी नगर पैलाड अमळनेर, गौरव विजय पाटील (वय-२१) रा. तांबापूरा अमळनेर आणि सुशिल अशोक मगरे (वय-३२) रा. लेले नगर पहूर ता. जामनेर असे तीन कैदी हे मित्र जगदीश पुंडलिक पाटील (वय-१९) रा. पिंपळकोठा ता. पारोळा यांच्या गाडीवर बसून पसार झाले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील कैदी सुशिल मगरे सोडून इतर फरार झालेले सागर पाटील, गौरव पाटील आणि त्यांना मदत करणारो जगदीश पाटील यांना शोध घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

तीनही कैदी फरार होण्यापुर्वी कैद्यांकडे मोबाईल आणि गावठी पिस्तूल आले कसे ? यासंदर्भात कसून चौकशी केली असता सिमकार्ड पॉड्सच्या डब्यात कैद्यांपर्यंत पोहचविण्याच्या कामाकरीत कैदी गौरव पाटील याने सबजेलमधून अमळनेर येथील मित्र नागेश मुकुंदा पिंगळे याने त्याच्या नावावर सिमकार्ड घेवून सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (वय-२४) रा. तांबापूर अमळनेर हा आपल्या मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ डीएन ४२५८) ने सिमकार्ड पोहचविण्यासाठी मदत केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कैद्यांना फरार होण्यास मदत करणारा सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील याला अटक केली असून गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

Protected Content