आदर्श विद्यालयात शिक्षक दिन साजरा

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील होते. आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची भूमिका साकारित असलेल्या मुख्याध्यापक व पर्यवेक्षक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून पूजन करीत या थोर समाजसेवकांना आदरांजली वाहीली. यावेळी विद्यालयाच्या उपशिक्षिका मीना तडवी व पाटील यांनी विद्यार्थी व विद्यार्थींना अमुल्य असे मार्गदर्शन केले. विद्यालयातील शैक्षणिक सत्राच्या शेवटच्या तासात कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात प्रसंगी शिक्षकाची वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांनी आपले दिवसभरातील शिक्षक पेशातील अनुभवाचे बोल बोलून दाखविले अध्यापन बाबत त्यांचे अनुभव कथन केले. सूत्रसंचालन सविता महाजन प्रास्ताविक व्ही. बी.पाटील तर कला शिक्षक अजय पाटील यांनी आभार मानले.

Protected Content