अट्रावल येथील दंगलीतील आरोपींना पोलीस कोठडी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथे महापुरूषांच्या पुतळा विटंबनेनंतर दोन समुदायात उसळलेल्या दंगलीतील आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

तालुक्यातील अट्रावल येथे बारागाडया ओढण्याची प्रथा असुन , दिनांक ३१ मार्च रोजी बारागाडयावर बसण्यावरून झालेला वाद दिनांक १एप्रील शनिवार रोजी उफाळुन आला. आंबेडकर नगरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. यानंतर झालेल्या दंगलीतील पोलीसांनी चार जणांच्या फिर्यादी वरून २०५ संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान,  पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील , फैजपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत १६ संशयितांना अटक करण्यात आली होती.  या सर्व संशयित आरोपींना आज यावलच्या न्यायालयात हजर केले असता न्या.एस. एम. बनचरे यांनी सर्व संशयीत आरोपींना पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content