लग्न मोडल्याच्या रागातून पोटावर चॉपरने वार : तरूण गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लग्न मोजण्याच्या कारणावरून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ तरुणावर चॉपर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या संदर्भात सोमवार ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. विक्की सांडू यादव (वय-२७) रा. ब्राह्मणसभा, बळीरामपेठ, जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विवेक किशोर मराठे रा. ब्राम्हण सभा, बळीराम पेठ, जळगाव याचा नातेवाईक गोलू मराठे याचे प्रेमसंबंध असलेल्या तरुणीशी लग्न जुळल्यानंतर ते विक्की सांडू यादव याच्यामुळे मोडण्यात आले. याचा राग मनात ठेवून विवेक मराठे हा याने रविवारी २ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात विवेक मराठे याने विक्कीच्या पोटात चॉपर खुपसला. यात विक्की हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिपक गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विवेक किशोर मराठे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर शहर पोलीसांनी विवेक मराठे याला अटक केली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.

Protected Content