खा. उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी प्राप्त झालेला आहे.

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधी अंतर्गत जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांना पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर झालेला आहे.

असे तीर्थक्षेत्र असा निधी

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध तीर्थक्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे. यात प्रामुख्याने श्री.क्षेत्र वालझिरी ता.चाळीसगाव येथे तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकासासाठी १ कोटी, चाळीसगाव येथील रेणुका माता मंदिर चाळीसगाव मंदिराचा पर्यटन निधीतून विकास करणे.
१५ लक्ष, करगाव रोड चाळीसगाव येथील गणेश मंदिराचा पर्यटन निधीतून विकास करणे.
१० लक्ष त्याच प्रमाणे खंडेराव महाराज मंदिर कराडी ता. पारोळा मंदिराचा पर्यटन निधीतून विकास करणे.१ कोटी , तसेच धनाई पुनाई माता मंदिर दरेगाव ता. चाळीसगाव मंदिराचा पर्यटन निधीतून विकास करणे ३० लक्ष.
बोळे ता.पारोळा येथील खंडेराव मंदिराचा पर्यटन निधीतून विकास करणे १ कोटी. श्री.क्षेत्र पाच पांडव मंदिर टिटवी ता. पारोळा येथे पर्यटन विकास अंतर्गत विकास कामे करणे ५० लक्ष.श्री.क्षेत्र चतुर्भुज नारायण मंदिर गिरड ता. भडगाव जि. जळगाव तीर्थक्षेत्राचा पर्यटन निधीतून विकास करणे ५० लक्ष या अनुषंगाने सुमारे पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, यापुढे तीर्थक्षेत्राला पर्यटनाची जोड दिल्यास या तीर्थक्षेत्रांच्या विकासाला अधिक मदत होणार आहे. याकरीता देव देश आणि धर्मासाठी पर्यटन निधीतून अशा तीर्थक्षेत्रांचा विकास होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले.

Protected Content