माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना विजयश्री !

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर मागासवर्ग या प्रवर्गातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सहजगत्या जिल्हा बँक संचालकपदासाठीच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे.

जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात अंतर्गत कलहातून इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या विरोेधात जिल्हा बँक संचालक संजय पवार यांचे बंधू विकास मुरलीधर पवार हे उभे ठाकले. यानंतर विकास पवार यांच्या पुढाकाराने शेतकरी पॅनल आकारास आले. या पॅनलच्या माध्यमातून त्यांनी सहकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना साफ अपयश आल्याचे दिसून आले. या पॅनलच्या एकही उमेदवाराला विजय मिळविता आला नाही. याच प्रमाणे माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी देखील विकास पवार यांना पराभूत करून जिल्हा बँक संचालकपदी निवडून येण्याचा आपला क्रम कायम ठेवला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत डॉ. सतीश पाटील यांना २३१६ तर त्यांचे विरोधक विकास पवार यांना १४२ मते मिळाली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!