अपेक्षेनुसार रोहिणी खडसेंची सरशी : दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत एंट्री

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी अपेक्षेनुसार विजय संपादन करत दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत एंट्री केली आहे.

जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या. यात महिला गटातून आघाडीच्या सहकार पॅनलतर्फे विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर आणि छायादेवी दिलीपराव निकम यांना उमेदवारी मिळाली. या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले तरी याला यश आले नाही. यामुळे अखेर या प्रवर्गासाठी निवडणूक घेण्यात आली. अर्थात, सहकार पॅनलची ताकद पाहता येथून रोहिणी खडसे यांचा विजय हा अगदी सहजसोपा असल्याचे मानले जात होते. आज निकालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

आज झालेल्या मतमोजणीत रोहिणी खडसे-खेवलकर यांना तब्बल २२००चा लीड मिळाला असून त्यांचा विजय निश्‍चीत आहे. त्या लागोपाठ दुसर्‍यांदा जिल्हा बँकेत संचालक म्हणून दाखल झाल्या आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!