देवकरआप्पा जिंकले : आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष !

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर संस्था आणि व्यक्तीगत सभासद या मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची सरशी झाली आहे. तर आज त्यांच्या उमेदवारीबाबत सुप्रीम कोर्टात लागणार्‍या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर संस्था आणि व्यक्तीगत सभासद या मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी केली. त्यांना जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी आव्हान दिले. त्यांनी देवकर यांना घरकूल घोटाळ्यात शिक्षा झाली असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करावा या मागणीसाठी रवींद्र पाटील यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली.मात्र देवकर यांना निवडणूक लढविता आली. तर आज त्यांनी विजय संपादन केला

आज झालेल्या मतमोजणीत गुलाबराव देवकर यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. यात देवकर यांना १६०१ मते मिळालीत. तर त्यांचे विरोधक रवींद्र पाटील यांना फक्त १८१ मते मिळाली आहेत. यामुळे गुलाबराव देवकर यांनी दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा जिल्हा बँकेत दिमाखदार एंट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दाखल असलेल्या याचिकेवरील निकाल हा शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!