महिला राखीव गटातून शैलजादेवी निकम यांची सरशी

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला राखीव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलच्या उमेदवारी शैलजादेवी निकम यांनी विजय संपादन करत जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये महिला राखीव उमेदवारीवरून देखील मोठे वाद झाले होते. ही जाग कॉंग्रेसला मिळून यात विद्यमान संचालिका अरूणा पाटील यांना उमेदवारी मिळावी असा आग्रह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील यांनी धरला होता. मात्र त्यांच्या ऐवजी जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या अध्यक्षा शैलजादेवी निकम यांना रोहिणीताई खडसे यांच्या सोबतीने उमेदवारी मिळाली. यातूनच डी. जी. पाटील यांनी इतर उमेदवारांच्या मदतीने शेतकरी पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली. मात्र यात या पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

आज जाहीर झालेल्या निकालात शैलजादेवी निकम यांना निर्णायक आघाडी प्राप्त झाली असून त्यांचा विजय निश्‍चीत झाला आहे. या विजयाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा बँक संचालिका म्हणून जेडीसीमध्ये प्रवेश केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!