Home Cities जळगाव मेहताबसिंग नाईक यांची पुन्हा जिल्हा बँक संचालकपदी निवड

मेहताबसिंग नाईक यांची पुन्हा जिल्हा बँक संचालकपदी निवड

0
119

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून मेहताबसिंग नाईक यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून आपले संचालकपद कायम राखले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलमधून मेहताबसिंग नाईक यांना उमेदवारी देण्यात आली होती. खरं तर ही जागा देखील बिनविरोध होण्याची शक्यता होती. तथापि, काही कारणांनी हे न जमल्यामुळे नाईक यांच्या समोर विकास ज्ञानेश्‍वर वाघ यांनी उमेदवारी केली. वाघ यांना नंतर शेतकरी पॅनलने पुरस्कृत केले. मात्र मेहताबसिंग नाईक यांनी एकतर्फी विजय संपादन केला.

विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघावर मेहताबसिंग नाईक यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे या निकालातून अधोरेखीत झाले आहे. अर्थात, ते पुन्हा एकदा जिल्हा बँक संचालकपदी आरूढ झाले आहेत.


Protected Content

Play sound