ओझरखेडा धरणात ७० टीएमसी पाणी सोडा – आ.चंद्रकांत पाटलांची मागणी

मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हतनुर पाणलोट क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्याने धरण चांगल्या क्षमतेत भरलेले आहे. हतनुर धरणाचे दरवाजे उघडे असल्याने वाहुन जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील  यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  केली आहे.

 

हतनुर ओव्हरफ्लो असल्याने वाहुन जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ओझरखेडा धरणाच्या साठवण क्षमतेत वाढ करुन ७०  टिएमसी पाणी सोडण्यात यावे.  पाणी सोडण्याचा खर्च संबंधित विभागाला शक्य नसल्यास जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात यावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आमदार पाटील  यांनी यापुर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत  मागणी केली होती. त्यानंतर  ओझरखेडा धरणात ३०  टिएमसी पाणी सोडण्यात येते. आता यात वाढ करुन ७०  टिएमसी पाणी साठविण्याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केली आहे. या धरणातील पाण्यावर भुसावळ तालुक्यातील असंख्य शेतकरी व औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर हा प्रकल्प पुर्णत: अवलंबून आहे. ७०  टिएमसी पाणीसाठा सोडण्यात आल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

Protected Content