Home Cities मुक्ताईनगर रोहिणी खडसे यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

रोहिणी खडसे यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

0
29


मुक्ताईनगर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मुंबई येथे गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेऊन मुक्ताईनगर मतदारसंघातील गृह खात्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले. 

दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने कुऱ्हा काकोडा येथे नविन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी, मुक्ताईनगर, सावदा, बोदवड या पोलिस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असुन आणखी पदे मंजुर करावी, मुक्ताईनगर येथे पोलीस स्टेशन इमारत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इमारत व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांचेकरिता निवासस्थान इमारत बांधकाम करणे आणि मुक्ताईनगर, सावदा, बोदवड येथील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असणारे जुने जीर्ण झालेले निवासस्थाने पाडून नविन निवासस्थानांचे बांधकाम करावे या मागण्यांचा समावेश आहे. यावर गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवुन जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडून संबंधित विषयासंबंधित माहिती घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

 


Protected Content

Play sound